Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा
नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा
नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा
Ebook194 pages1 hour

नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

येशू ख्रिस्ता द्वारे तारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक अंतिम मार्गदर्शक आहे. ह्या उत्क्रष्ट पुस्तकामध्ये, येशू तुमच्यावर किती प्रेम करतो, तुम्ही नव्याने कसे जन्म घेऊ शकता, तुम्ही नरकांत जाण्याचे कसे टाळू शकता, आणि ख्रिस्त येशूमध्ये नवी सृष्टी म्हणजे काय हे तुम्हांला समजून येईल. हे पुस्तक कोणालाहि द्या आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे तारण म्हणजे काय हे त्यांना समजून येईल.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354233
नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा

Related ebooks

Reviews for नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    नव्याने जन्म होऊन नरक कसा टाळावा - Dag Heward-Mills

    महान प्रेमासह देव तुमच्यावर प्रेम करतो

    जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही. मी तुम्हांला जे कांही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहां.

    योहान १५:१२-१४

    देवाचे महान प्रेम तुमचे जीवन कायमचे बदलून टाकील. पृथ्वीवर जे कांही आहे त्यांपेक्षाहि हे प्रेम सर्वांत महान आहे. जेंव्हा एखादा पुरुष एका स्त्रिला म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, तेंव्हा मी ज्या प्रेमाबद्दल ह्या पुस्तकांत लिहित आहे त्या महान प्रेमाची तुलना ह्या प्रमाशी होऊ शकत नाही. तुमची आई, तुमचे वडील तुमच्यावर प्रेम करू शकतात परंतु ते तुमच्यासाठी त्यांचा प्राण देऊ शकणार नाहीत. तुमचा प्रियकर, तुमची मैत्रीण तुमच्यावर प्रेम करू शकतात, परंतु त्यापैकी कोणीहि तुमच्यासाठी मरू शकणार नाही.

    हे पुस्तक देवाच्या त्या महान प्रीतिबद्दल आहे. ह्या महान प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी जेंव्हा तुम्ही तुमचे हृदय उघडता, तुमचा नव्याने जन्म होतो. देवाने देऊ केलेल्या ह्या प्रेमासाठी जेंव्हा तुम्ही तुमचे हृदय उघडता, तुम्ही नवीन उत्पत्ति होता, आणि पूर्णपणे एक वेगळे जीवन जगू लागता. देवाने देऊ केलेल्या ह्या प्रेमासाठी जेंव्हा तुम्ही तुमचे हृदय जर उघडले, तेंव्हा नरकाच्या शिक्षेपासून तुम्ही तुमचा बचाव करता. तुम्ही आणि मी सुद्धा नरकांत जाण्यासाठी पात्र आहोत. परंतु देवाच्या प्रीतीद्वारे ज्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमचा नाश होऊ नये तर आम्ही नव्याने जन्म व्हावा ह्यासाठी पाठविले. हालेलुया! आपण नवीन उत्पत्ति होऊ शकतो! त्या बाहेरील अंधारापासून व नरक यातनांपासून आपला बचाव होऊ शकतो. हे कसले प्रेम आहे की आपण आपल्याला देवाची मुलें म्हंटले जाते? हे किती महान तारण आपल्याला दाखविण्यांत आले आहे की आपल्याला आपल्या पापांपासून तारण्यासाठी येशूने त्याचे रक्त सांडावे!

    तुम्ही तुमचे हृदय उघडावे आणि ख्रिस्त जे महान तारण तुम्हांला देऊ करीत आहे त्याचा तुम्ही आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मला सांगतांना दु:ख होते की, बहुतांश ख्रिस्ती लोक तारण म्हणजे काय हे समजत नाहीत. आणि ह्याच कारणास्तव मी हे पुस्तक लिहित आहे. वर्तमान काळांत क्वचितच तारणाबद्दल उपदेश दिला जातो. हिंच ती वेळ आहे की, ज्या पायावर ख्रिस्ती धर्म सर्वकाळ टिकून राहील तो भक्कम पाया आपल्याला परत आणला पाहिजे.

    महान प्रेमाविषयी तुम्हांला सात गोष्टींची माहिती असली पाहिजे

    १. प्रेम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, परंतु येशूचे प्रेम हे सर्वांत महान आहे.

    अस्तित्वांत असलेल्या सर्व प्रेमांपैकी देवाचे प्रेम हे विशेष प्रकारचे आहे. देवाच्या प्रेमाचे वर्णन करणा-या खालील शास्त्रवचनांना लक्षपूर्वक वाचा. हे कसल्या प्रकारचे प्रेम आहे? देवाचे प्रेम हे महान, सार्वकालिक, आणि सर्वांत महान प्रेम आहे,

    आपल्याला देवाची मुलें हे नांव मिळाले ह्यांत पित्याने आपल्यावर केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही.

    १ योहान ३:१

    तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतांहि त्याने आपल्यावरील स्वत:च्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणांला जिवंत केले (कृपेनेच तुमचे तारण झालेले आहे)

    इफिसकरांस पत्र २:४-५

    देवाची आपल्यावर जी प्रीति आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे, देव प्रीति आहे; जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. न्यायाचा दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीति आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे; कारण जसा तो आहे तसे ह्या जगांत आपणहि आहो.

    १ योहान ४:१६-१७

    परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.

    यिर्मया ३१:३

    प्रियकर आणि महान प्रेम

    जिवलग प्रियकर असलेल्या एका महिलेला मी ओळखत होतो. ह्या प्रियकर युवकाची त्या तरुण महिलेशी लग्न करण्याची इच्छा होती, परंतु त्याने तिच्याशी चांगली वागणूक केली नाही. त्याच्या मैत्रीणीत आणि इतर मुलींच्या मध्ये जणू काही तो धडपड करत होता. किमान म्हणायचे म्हणजे, त्यांचे संबंध गोंधळलेलेच होते. शेवटी एके दिवशी ही तरुण महिला घरी आली आणि तिने म्हंटले, सारे कांही समाप्त झाले. ती रडत होती कारण तुटलेल्या संबंधामुळे तिचे हृदय भग्न झाले होते. परंतु मी तिचे सांत्वन करीत तिला म्हटले की, देव ह्याहिपेक्षा चांगला प्रियकर तिच्या जीवनांत पाठवील.

    कांही महिन्यांनतर देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि एक देखणा युवक अचानक आला व त्या महिलेच्या प्रेमांत पडला. ते त्यांच्या संबंधाचा आनंद घेतांना दिसत होते आणि एके दिवशी मी त्या तरुण महिलेला विचारले, तुझे नवीन संबंध कसे आहे?

    गालातल्या गालात हसून ती म्हटली, पहिल्या संबंधांपेक्षा फार उत्तम आहे. माझ्याशी देव चांगला आहे.

    दुस-या शब्दांत सांगायचे म्हणजे, ती एका महान प्रेमाचा आणि चांगल्या संबंधाचा अनुभव घेत होती. आणि म्हणून मी तिला विचारले, हा संबंध अधिक चांगला का आहे?

    तिने म्हटले, मी किती आनंदी असू शकेन ह्याची मला कल्पना नव्हती. एका अधिक महान प्रेमाचा मी अनुभव घेऊ शकेन हे मला ठाऊक नव्हते.

    खरच ह्या महिलेने एका महान प्रकारच्या प्रेमाचा अनुभव घेतला होता. अशाच प्रकारचे देवाचे प्रेम आहे. हे एक महान प्रकारचे प्रेम आहे. हे कसल्या प्रकारचे प्रेम आहे?

    २. ‘बंधूंच्या प्रेमापेक्षा’ येशूचे प्रेम महान आहे .

    निर्दभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीति करा.

    १ पेत्र १:२२

    अनेक कुटुंबांचे एकमेकांशी नाते आहे हे सत्य माहित असूनहि त्यांचे विघटन झाले आहे. त्यांचे संबंध भंग होतात आणि वारंवार ते एकमेकांशी भांडण करतात. भावांच्यामध्ये असलेल्या प्रेमापेक्षा येशूचे प्रेम कितीतरी श्रेष्ठ आहे.

    मूत्रपिंड दान

    एकदा एका प्रार्थना सभेमध्ये एका ज्या बंधुला मूत्रपिंडाची आवश्यकता होती त्याला मूत्रपिंड दान म्हणून मिळावे ह्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. त्यांनी त्या बंधुसाठी त्यांचे प्रेम जाहीर केले आणि मूत्रपिंड दानाद्वारे त्या बंधूने जगावे अशी इच्छा दर्शविली.

    तथापि, प्रार्थना सभा चालू असतांना, ज्या मूत्रपिंड प्राप्तीसाठी ते प्रार्थना करीत होते ते मूत्रपिंड दान करण्यांस कोणीहि तयार नव्हते ह्याची त्यांना जाणीव झाली. शेवटी, त्या प्रार्थना सभेच्या नेत्याने ठरविले की कोणाचे मूत्रपिंड दान म्हणून द्यावे हे देवाला ठरवू द्यावे हा निर्णय घेतला.

    म्हणून त्याने एक हलके फुलके पीस घेतले आणि सभेच्या सर्व सदस्यांना सांगितले की तो ते पीस हवेमध्ये उडविणार आणि ज्या कोणावर ते पीस येऊन बसेल त्याने त्याचे मूत्रपिंड दान करावे. सर्व जण त्या दैवी प्रक्रियेशी सहमत झाले.

    त्याने ते पीस हवेमध्ये उडविले. ते उंच वर गेले आणि आश्चर्यकारकपणे खाली आले आणि सरळ त्या नेत्याच्या स्वत:वर उतरले. अचानकपणे त्या नेत्याने ओरडण्यांस सुरुवात केली व ते पीस त्याच्याकडे येऊ नये म्हणून त्या पिसावर तो फुंकू लागला. त्यावरून हे स्पष्ट होते की कोणीहि, स्वत: तो नेता देखील त्यांचे मूत्रपिंड देण्यांस तयार नव्हता. तुम्ही कोणावर प्रेम करता हे सांगणे एक गोष्ट आहे परंतु ते महान प्रेम जे इतरांसाठी स्वत:चा त्याग करते ते असणे दुसरी गोष्ट आहे.

    ३. स्त्रियांच्या प्रेमापेक्षा येशूचे प्रेम महान आहे.

    स्त्रियांच्या प्रेमाविषयी अनेक गीतें लिहिली गेली आहेत. खर पहिले तर पुरुष आणि स्त्रियांमधील प्रेमाविषयी बहुतेक गीतें लिहिली आहेत आणि तरी सुद्धा पुरुष आणि स्त्रियांच्या नातेसंबंध भंगाने ह्या जगांत खूप वेदना निर्माण होतात. ओह, किती सहजपणे स्त्रियांचे प्रेम विरजून जाते! ज्या

    Enjoying the preview?
    Page 1 of 1